¡Sorpréndeme!

Students Protest |१२वीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी ;पाहा व्हिडीओ

2022-01-31 888 Dailymotion

Students Protest |१२वीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी ;पाहा व्हिडीओ

राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार या अफवेने नागपूरात विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं. नागपूरातील मेडिकल चौक परिसरात अचानक विद्यार्थी एकत्र झाले आणि ऑफलाईन परीक्षे विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा हिंदुस्थानी भाऊ नामक तरुणाने पसरली होती. या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनं केलं होतं. त्यामुळे विद्यार्थी एकत्र आले. 'वर्षभर आमचा ऑनलाईन अभ्यास झाला, आमची लिहण्याची सवय तुटली, त्यामुळं ऑनलाईन परीक्षा घेतली तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळं एकतर परीक्षा रद्द करावी, किंवा ऑनलाईन परीक्षा घाव्या, अशी मागणी करत वीद्यार्थी आक्रमक झाले होते. दरम्यान एका शहर बसच्या काचा ही विद्यार्थ्यांनी फोडल्या. मात्र, पोलिसांनी वेळीच येत विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि त्यांना परत पाठवलं.